वेंगुर्ला प्रतिनिधी- रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, ग्रीन नेचर क्लब (बॅ.खर्डेकर महाविद्यालय), स्वामिनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मालवण व वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे मांडवी किनारी असलेल्या कांदळवनामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/देश-महिलांना-मिळणार-१-रुप/
ह्यामध्ये जवळपास ५० किलोहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. ह्या कच-यामध्ये घरगुती वापरातील प्लॅस्टिकच्या वस्तू, बॅगा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, मासे पकडण्याच्या जाळ्या, ताडपत्र्या, प्लास्टिकच्या गोण्या, दारुच्या काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या यांचा समावेश होता.
हा असाच कचरा जर कांदळवनांमध्ये साठत राहिला तर ही कांदळवने मरुन जातील व चक्रीवादळ, त्सुनामी ह्यांसारख्या विनाशकारी आपत्तींना तोंड द्यावे लागेल अशी भिती उपस्थितांनी व्यक्त केली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वामिनी महिला बचत गटाच्या सर्व महिला, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.धनश्री पाटील, प्रा.राजाराम चौगुले, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा.रविना गवस, प्रा.शलाका वालावलकर, कु. दिपक कदम, कु. चैताली पाटकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष प्रितीश लाड, पल्लवी भोगटे तसेच पर्यावरणप्रेमी विवेक परब आदी उपस्थित होते.
फोटोओळी – कांदळवन परिसराच्या स्वच्छतेत प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.


